HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील हॉटेल 10 पर्यंत राज्यातील हॉटेल सुरु, धार्मिक स्थळे अजुनी बंद!

मुंबई | राज्यातल्या मंत्रिमंडळाची आज(११ ऑगस्ट) बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयामुळे हॉटेलचालकांच्या लढ्याला यश आलं आहे.

हॉटेल वाल्यांना दिलासा

राज्यातील हॉटेल १५ ऑगस्ट पासून रात्री १० वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून हॉटेल चालकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कमी आसनक्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांपैकी आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मॉल आणि चित्रपटगृह अजूनही बंद

मॉल्स मध्ये ज्यांनी लसीचे २ डोस घेतले आहेत त्यांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. चित्रपटगृहे यांच्या बाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यासंदर्भातील कोणातही निर्णय अद्याप समोर आलेला नाही. लग्न सोहळ्यासाठी १०० माणसांची परवानगी देण्यात अली आहे. मात्र सगळ्या नियमांचं पालन करून सोहळा पार पडण्याची विनंती केली आहे.

खासगी कार्यालयात लसीकरण बंधनकारक

आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी माहिती दिली आहे कि खासगी कार्यालय २४ तास चालू ठेवली तरीही चालेल. मात्र कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक आहे. लोकलने देखील प्रवास करण्यासाठी आता २ डोस गरजेचे आहेत.

धार्मिक स्थळे मात्र अजूनही बंदच राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे दीड वर्ष बंद आहेत. कोरोना रुग्ण जरी कमी झाले असले तरी देखील धार्मिक स्थळांवर बंदी आहे. राज्यमंत्र्यांची आज(११ ऑगस्ट) बैठक पार पडली ज्यात हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून 5 लाख रुपये मिळणार

Aprna

भाजपने ‘शवासन’ करावं, राऊतांचा योग दिनी खोचक सल्ला!

News Desk

मोदी, शहा यांना समजण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील !

News Desk