HW News Marathi
महाराष्ट्र

कोश्यारीजी इतका अभ्यास बरा नाही; राऊतांचा टोला

मुंबई | “राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नाही. त्यांना अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत  लगावला आहे. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवरून राऊतांनी राज्यपालांवर टीका केली. राऊतांनी आज (२७ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना टीकास्त्र केले. राज्यपालांनी १२ आमदारांच्या शिफारशईला एक वर्ष पूर्ण झाले असून राज्यपाल अभ्यास सुरू आहे. यात शांतता अभ्यास सुरू आहे, अशी टीका राऊतांनी केली. 

राऊत म्हणाले, “राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नाही. त्यांना अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे. येथे लॉकडाऊन काळात अभ्यास कामी झाला आहे. राज्यात आता प्रत्येक गोष्टी अभ्यास करायला लागलात. तर मग संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. यानुसारच त्यांनी काम करायचे असून घटनेत स्पष्ट केले की, मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्यच करायला पाहिजे.”  

“१२ आमदारांच्या शिफारशीला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे, असे नवीन नाट्य राजभवनात सध्या सुरूच आहे. केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटके होते असतात,” असा टोला राऊतांनी लगावला

सामनातून भाजपवर टीका

भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देणगी अभियान सुरू केले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांसारख्या भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी देणग्या दिल्याच्या पावत्या सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. तसेच जनतेलाही देणगी देण्याचे आवाहन केले आहे. मात्र पंतप्रधानांनी असे आवाहन करणे योग्य नाही, असे म्हणत जगातील सर्वात श्रीमंत पक्षाला देणगी दिल्याने देश खरंच बलाढ्य होईल का, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतलं निर्भया बलात्कार कांड, मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना 5 मोठ्या सुचना!

News Desk

“२४ तासात चौकशीसाठी हजर राहा, नाहीतर घरी येऊन चौकशी करू”, देशमुखांना ईडीचं उत्तर

News Desk

फडणवीसांच्या घराबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात

News Desk