HW News Marathi
महाराष्ट्र

“परमबीर सिंह-सचिन वाझेंची भेट नियमबाह्य, पोलिसांकडून होणार चौकशी!” – गृहमंत्री

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे या दोघांमध्ये चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी सिंहा आणि वाझे आमने-सामने आल्यानंतर या दोघांमध्ये तब्बल १० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. या दोघांच्या भेटीवरू राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “या दोघांची भेट होणे हे अत्यंत चुकीचे असून या दोघांची भेट नियमबाह्य आहे. एखादा आरोपीला न्यायालयीन कोठडी असताना. त्यांना न्यायालयाच्या परवागनीशिवाय बाहेर भेटण्याचे नसेत. तसे असताना देखील या दोघांची भेट झाल्याची माहिती समजली आहे. यावर पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

सिंह आणि वाझे यांच्या भेटीसाठी परवानगी होती की नाही?, यांचा तपास मुंबई पोलीस करणार असून जर या दोघांची भेटीला परवानगी नसेल?, तर या दोघांची भेट कशी काय झाली?, या संपूर्ण प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करणार आहे. तसेत सिंह आणि वाझेंना चांदीवाल आयोगासमोर हजर करणाऱ्या पथकाची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वळसे पाटलांनी माध्यमांशी बोलता सांगितले.

सिंहांनी गाडीचा वापर करणे चुकीचे

तसेच गृहमंत्री पुढे बोलताना ते म्हणाले की, “परमबीर सिंह यांचा गाडीचा वापर करत आहेत. ते अत्यंत चुकीचे असून ते कामावर नाहीत त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील सिंहांनी पोलिसांच्या गाडी वापरत आहेत. हे चुकीचे आहे, यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारच्या मदतीने वेळेत योजना पूर्ण करण्यास प्राथमिकता! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र !- बाळासाहेब थोरात

News Desk

परतीच्या पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी! शेतातच संपवलं आयुष्य

Manasi Devkar