मुंबई | “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय एजन्सींना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात खूप रस दाखवत आहेत. मी त्यांना सुचवितो की, त्यांना स्वत:ची नेमणूक विशेष अधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करावी, आणि तसेही त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा भरपूर अनुभव आहे,” असे ट्वीट राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाव न घेता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. मलिकांनी आज (२० डिसेंबर) सकाळी ट्वीट करत टीका केली आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1472779677404057600?s=२०
मलिकांनी ट्वीटमध्ये म्हटले, “माजी महा मुख्यमंत्री केंद्रीय एजन्सींना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात खूप रस दाखवत आहेत. मी सुचवितो त्यांना स्वत:ची नेमणूक विशेष अधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करावी, आणि तसेही त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा भरपूर अनुभव आहे. आणि किरीट सोमय्या यांना प्रवक्ता म्हणून नियुक्त करा.” याआधी मलिकांनी काल (१९ डिसेंबर) रात्री ट्वीट करत म्हणाले, “मला अशी माहिती मिळाली आहे की, उद्या सकाळी माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार आहेत. आणि त्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मी चहा बिस्कीट तयार केले आहे. जर त्या पाहुण्यांना माझे घर सापडले नाही, तर त्यांनी मला फोन करावा,” असे या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले होते. मलिकांच्या ट्वीटमुळे त्यांच्या घरावर ईडी किंवा इनकम टॅक्स विभागचा छापा पडणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळाली आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1472578444726718465?s=२०
मुंबई ड्रग्ज क्रूझ प्रकरणानंतर मलिकांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. यानंतर मलिकांनी वानखेडेंनी खोटे जातीचे प्रमाणपत्रावर सरकारी नोकरी मिळवल्याचे त्यांनी उघडकीत आणले होते. या प्रकरणावरून वानखेडेंवर चौकशी सुरू आहे. मलिकांनी वानखेडेंच्या कुटुंबियांवर देखील आरोप केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.