HW News Marathi
Covid-19

आता राज्यात लॉकडाऊन करायचा असल्यास केंद्राची परवानगी लागणार

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्यामुळे सरकार महत्वाची पावले उचलत आहेत.आता देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

तसेच राज्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. तसेच घरी जाऊन आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. हे दिशानिर्देश 1 ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असतील.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना :

* सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

* सामाजिक अंतर राखणं गरजेचं

* सतत हात धुणे आवश्यक

* चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी

* जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी

* धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात २०० जणांना परवानगी

* बंद मोठ्या सभागृहात १०० जणांना परवानगी

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात २४ तासांत ४० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त

News Desk

केंद्राच्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष मदतीपेक्षा घोषणा अन् आकड्यांचाच मारा अधिक

News Desk

आईच्या निधनानंतर ३ दिवसातच राजेश टोपे पुन्हा राज्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले

News Desk