HW News Marathi
महाराष्ट्र

BMC मध्ये लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी की कंत्राटात टक्केवारीत आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी?, भाजप आमदाराचा सवाल

मुंबई | मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी आपण अत्याधुनिक टनेल लाँड्री बनवण्याचा कंत्राट १६० कोटीचा काढला आहे, पण ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी?, असा सवाल भाजप आमदार अमित साटम यांनी विचारला आहे. तसेच अमित साटम म्हणाले की “मला मिळालेल्या खात्री लायक माहितीने हा कंत्राट काढण्यासाठी आपल्या एका अधिकाऱ्याने १६ कोटीची रक्कम स्वीकारली आहे. त्याचे सविस्तर पुरावे मी वेळ आल्यावर तपास यंत्रणेला सादर करील. “

अमित साटम यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं असून या पत्रात साटम महापालिका आयुक्तांना उद्देशून म्हणतात की, “एकूणच आपण १६० कोटीच्या टनेल लाँड्रीचा अभ्यास केल्यास माझ्या आरोपात किती तथ्य आहे हे आपणास लक्षात येईल कारण कुठलेही तंत्रज्ञान, टेकनिकल स्पेसीफिकेशन किंवा अनुभव याबाबत यात कुठलीही एकसुत्रता नाहीये आणि सगळ्या गोष्टी विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होईल याच हिशोबाने ‘ट्विक’ केल्या आहेत.”

“जेव्हा नविदा निघते तेव्हा MCGM आणि CVC गाईडलाईन नुसार संबधित कंपनीच्या कामांचाच अनुभव ग्राह्य धरला जातो. परंतु ही मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसवून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या व विदेशातील कंपन्यांनाचाही मार्ग सुकर करण्यात आला आहे.”

“टक्केवारीने डोळे झाकले असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना याचेही भान राहिले नाही की ज्या रुग्णालयाच्या आवारात ही टनेल लाँड्री उभारण्याचे प्रस्तावित आहे, ते क्षयरोगाचे रुग्णालय आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जर क्षयरोग रुग्णालयात टनेल लाँड्री बनवून तिथे धुवून व सुकवून पाठवले तरी त्याद्वारे जंतूसंसर्ग होणार नाही याची हमी आरोग्य विभाग देणार आहे का? आणि या भितीपोटीच आरोग्य विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. जर आरोग्य विभागाला ही भीती वाटत असेल तर त्याठिकाणी टनेल लाँड्री उभारण्याचा हट्ट धरुन भविष्यात रुग्णालयातील विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण आणि डॉक्टर यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला जात आहे?”

“आपणास प्रशासक म्हणून ही सुचना करू इच्छीतो की त्वरीत निविदा प्रक्रिया रद्द करावी व संबंधित अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आपणही त्यांच्याच हेतूला पुरस्कृत करित आहात अशी धारणा जनसामान्यांमध्ये प्रस्थापित होईल”, असं साटम यांनी या पत्रात म्हंटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांची पुन्हा कोल्हापूर दौऱ्याची घोषणा; आता दिलं ‘हे’ कारण!

News Desk

“अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला”, पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर पडळकरांची खोचक टीका

News Desk

राज्यात बैठका सुरुच, महाविकासआघाडीची आज महत्वाची बैठक होणार!

News Desk