HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut म्हणजे पोपट; Navneet Rana यांची टीका

आमदार रवी राणा यांनी म्हटले की, मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही असेही रवी राणा यांनी म्हटले. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटले. संजय राऊत हे पोपट आहेत. दररोज सकाळी पत्रकारांना जमवून बडबड करत असतात. गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार असल्याचे नवनीत राणाने म्हटले. शिवसैनिक आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यांनी मुंबईत पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आम्ही मुंबईत आलो आहोत.

#RaviRana #NavneetRana #SanjayRaut #RaviRana #AnilParab #KishoriPedenekar #Matoshree #Amravati #ShivSena #BJP #HanumanChalisa #DevendraFadnavis #NawabMalik #SupremeCourt 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale | मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही

Atul Chavan

“50 खोके आणि गद्दारीचं उत्तर आमच्या मेळाव्याच्या गर्दीतून देऊ” : Uday Samant

Seema Adhe

Raj Thackeray यांना टीका आणि नकलांशिवाय काहीच जमलं नाही, Ajit Pawar यांची टीका

News Desk