HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या महसुलात ऑगस्टमध्ये ३,७२४ कोटींनी झाली घट!

मुंबई। महाराष्ट्र राज्यात वस्तू व सेवा करातून मिळणाऱ्या उत्पन्नात जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ३,७२४ कोटींनी घट नोंदविण्यात आली, मात्र दुसरीकडे, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत दस्त नोंदणीत घट झाल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल ३,६३४.६७ कोटींच्या तुटीचा सामना करावा लागला. राज्याचा महसूल आटल्याने निबंध शिथिल होऊनही अर्थचक्र अद्यापही रुळावर आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे .

वस्तू व सेवा कर ३,७२४ कोटींनी घटला…

संपुर्ण देशात वस्तू व सेवा कराची ( जीएसटी ) सर्वाधिक वसुली होणाऱ्या महाराष्ट्रात जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वसुली ३,७२४ कोटी रुपयांनी घटली. महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये वस्तू व सेवा करापोटी १५,१७५ कोटी रुपये संकलित झाले. ऑगस्ट २०२० च्या तुलनेत ही वाढ ३१ टक्के अधिक आहे. परंतु , गेल्या वर्षी या काळात कोरोनाचे निर्बंध कठोर होते आणि अनेक व्यवहार बंद होते. याउलट यंदाच्या जुलै महिन्यात राज्यात १८,८ ९९ कोटींची वसुली झाली होती. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील करसंकलन ३,७२४ कोटींनी घटले. ऑगस्टमध्ये राज्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आणि बहुतांश व्यवहारही सुरू झाले होते. मात्र , अर्थचक्र अद्याप रुळावर आलेले नाही, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे मत राज्य शासनातील उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात आले . देशात सर्वाधिक वस्तू व सेवा कर संकलन महाराष्ट्रात होते. या पाठोपाठ गुजरात ( ७,५५६ कोटी ) , कर्नाटक ( ७,४२ ९ कोटी ) आणि तमिळनाडू ( ७,०६० कोटी ) या राज्यांमध्ये करसंकलन झाले . उत्तर प्रदेशात ५, ९४६ कोटी करसंकलन झाले.

मुद्रांक शुल्क 3,634.67 कोटींची तूट

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत दस्त नोंदणीत घट नोंदविण्यात आली . त्यामुळे या कालावधीत नोंदणी विभागाला मालमत्ता खरेदी – विक्री व्यवहारांमधून १२ हजार ५०० कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८८६५.३३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला . त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला तब्बल ३,६३४.६७ कोटींची तूट आल्याचे स्पष्ट झाले आहे . नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दरवर्षी महसूल गोळा करण्यासाठी उद्दिष्ट दिले जाते . सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे . त्यानुसार दर महिन्याला २५०० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणे क्रमप्राप्त आहे . मात्र , गेल्या आर्थिक वर्षात राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत चालू आर्थिक वर्षात दिलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Axis बँकेवर ठाकरे सरकारची कृपा, अमृता फडणवीसांवर करत होते टीका

News Desk

शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार जाहिर

News Desk

सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली बैठक

Aprna