HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा झटका नाही तर…!, अजित पवारांची माहिती

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती मिळाली असून मुंडेंना काल (१२ एप्रिल) रात्री तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१३ एप्रिल) मुंडेंची रुग्णालयात जावून भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा झटका आला नसून त्यांना भोवळ आल्याने ते बेशुद्ध झाला. सध्या मुंडेंची प्रकृती ठिक असून त्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले आहे.” 

अजित पवार म्हणाले, “धनंजय मुंडेंना काल कार्यलयात अचानक भोवळ आली. यानंतर मुंडे हे बेशुद्ध झाले होते.  यानंतर त्यांचा एमआयआर करण्यात आला.  आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मुंडेंना त्यांना दुपारी वार्डमध्ये शिफ्ट करणार असून सध्या त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली आहे. मुंडेंना भोवळ आली असून  एमआरआय करण्याचे काम सुरु आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आणि कार्यकर्त्यांनी येथे येऊन गर्दी करू नये, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही, असे ट्वीट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केले आहे. राजेश टोपे ट्वीटमध्ये म्हटले, “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इ. मुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर!’ कोठडीत 18 सप्टेंबरपर्यंत वाढ

News Desk

राजकीय नेत्यांनी जनतेला दिला सोशल मीडियावरुन धीर

swarit

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचा गौप्यस्फोट!

News Desk