HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा रडीचा डाव । अनिल परब

मुंबई। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे रेल्वेची मागणी केल्यानंतर मध्यरात्री रेल्वेचे शेड्युल पाठवले. यात बहुतांश ट्रेन या दुपारी १२च्या आत सोडायच्या होत्या. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रेन नियोजन करण्यामागे कारण काय? असा सवाल करतानाच महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा डाव केंद्राकडून सुरू आहे,’ अशी टीका राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर केली.

अनिल परब यांनी रेल्वेच्या अजब कारभारावरून केंद्र सरकारवर निशाण साधला आहे. आम्ही केंद्राकडे दररोज ८० गाड्या पाठवण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ४० गाड्या मिळाल्या. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वक्तव्य केल्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी स्थलांतरित मजुरांची यादी पाठवा, ताबडतोब रेल्वे व्यवस्थ करू असे, ट्वी करत म्हणाले होते. दरम्यान, राज्य सरकारने १ मेपासून ते २४ मे पर्यंत आम्ही जवळपास ७५५ गाड्यांमधून ७ लाख ७६ हजार मजुरांना त्यांच्या गावी पाठवले. त्यानंतर २६ मे नंतर महाराष्ट्राला १७२ गाड्या सोडण्याची विनंती केंद्राला केली. त्यावर केंद्राने रात्री अडीच वाजता आम्हाला गाड्यांचे वेळापत्रक पाठवले. यातील बऱ्याच गाड्या दुपारी १२ वाजताच सोडायच्या होत्या.

पश्चिम बंगालासाठी आम्ही ४८ गाड्यांची मागणी केली होती. पुढच्या काही दिवसांत पश्चिम बंगालसाठी आणखी ४८ गाड्या सोडण्यास सांगितले होते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वादळ आल्याने पश्चिम बंगाल सरकारने दररोज किमान दोनच गाड्या पश्चिम बंगालसाठी सोडण्याची विनंती महाराष्ट्राला केली होती. आम्ही ही विनंती मान्य केली. पश्चिम बंगालसाठी एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे नियोजन करण्याची गरज काय होती? असा सवालही परब यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वादळ आलेले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने दोन दिवस महाराष्ट्रातच थांबावे. त्यानंतर तुमच्या जाण्याची व्यवस्था केली जाईल, असे परब म्हणाले.

Related posts

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला

News Desk

दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? सामनातून अजित पवारांवर टीका

News Desk

माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी

News Desk