HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांवर चर्चा करण्यासाठी परब थेट पवारांच्या भेटीला

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी आज (१३ नोव्हेंबर) सकाळी सिल्व्हर ओकला गेलं आहं. या बैठीकत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाकडून भडवलं जात असल्याचा आरोपही परबांनी काल (१२ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना केला आहे. तर काही एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याची तयारी दर्शवली आहे. तर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाणार असल्याचं आश्वसन देखील त्यांनी दिले आहे. हायकोर्टाच्या मिटिसमोर म्हणणे मांडा, असेही ते म्हणालं

तसेच कामावर या नाही तर कारवाईला सामोरे जा, असा इशाराही परबांनी कामगारांना दिला आहे. कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाकडून भडकविलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामगारांच्या नुकसाची जबाबदारी नेते घेणार नाही, असे सूचक विधानही परबांनी केले. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर या असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. “एसटीच महामंडळाची राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी लगेच पूर्ण होण्यासारखी नाही. विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं हायकोर्टासमोर मांडावे. आम्ही चर्चा करायला तयार आहोत,” असे परब माध्यमांशी बोलताना म्हणालं.

राज ठाकरे- शरद पवार यांच्यी भेट

एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी केली आहे. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर गेले आहे. एसटी कर्मचारी हे आझाद मैदानात संपावर बसले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (१२ नोव्हेंबर) शरद पवार यांची त्यांच्या निवसस्थानी भेट घेतली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढील तीन महिन्यात नाशिकच्या वाड्या-पाड्यापर्यंत पाणी पोहचवणार! – आदित्य ठाकरे

Aprna

‘राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपमधील गद्दार लोकं कळाली’ – एकनाथ खडसे

News Desk

Amol Bhosale Exclusive : कमल ३७० आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही हे म्हणणे चुकीचे !

News Desk