HW News Marathi
महाराष्ट्र

“ST महामंडळाच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही!”

मुंबई | “एसटीचं खासगीकरण करण्याचा आमचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही,” असे म्हणत राज्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. तसेच आम्ही वेगवेगळ्या पर्यायांचा काय वापर करू शकतो, यावर चर्चा सुरू आहे. एसटीचं उत्पन्न कसे वाढवायचं यावर चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आजही तोडगा निघालेला नाही.

हायकोर्टाने नेमलेली कमिटी विलीनीकरणाबाबात निर्णय घेईल, अस मत परबांनी माध्यमांशी बोलताना मांडले. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांचं जे प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी चर्चेची दारे खुली असल्याचेही ते म्हणालं. पंरतु नेमकी चर्चा करायची कोणाशी हा प्रश्न उपस्थित राहतोय, असा उलट सवाल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना विचारला आहे. कारण ते कोणत्याही युनियचं ते ऐकत नाहीत. भाजप नेते जे माझ्याशी बोलतात त्यांचे एसटी कर्मचारी ऐकता की नाही, याबद्दल देखील आमच्या मनात आता शंका निर्माण झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे लिडर लेस आंदोलन

विलीनीकरणाचा विषय जो माझ्या हातात नाही. तो निर्णय कोर्टानं नेमलेल्या कमिटीच्या हाता आहेत. ते सोडून कोणत्याही चर्चेला माझी तयारी आहे. परंतु चर्चा नेमकी कोणाशी करायची हे लिडर लेस आंदोलन झाले आहे. त्यामुळे कामगारांनी सांगावे, त्यांचं प्रतिनिधीत्व कोण करणार, कोण करणार हे सांगावे. त्यांना चर्चेला कधीही बोलवू शकतो. त्यांच्याशी चर्चा करू शकतो. एसटी संपामुळे जो डेड लॉक झाला. हा राज्यातील जनतेला. एसटीला हानीकारण आहे ऐवढेच कळते, असे स्पष्ट मत परबांनी मांडलं.

एसटी कामगारांनी वेतन वाढीवर चर्चा करावी

वेगवेगळ्या राज्यांचा अहवाल देखील आम्ही मागितला आहे. आमचे अधिकारी देखील वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतात. तेथे कशा पद्धतीनं एसटी चालतं. कामगारांचे पगार, वेतन श्रेणी, आता सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करत आहेत. भाजप नेते गोपीनाथ पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा बोलो. हे देखील जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरणार तर मग हा तिडा कायम राहिल, असे ते म्हणालं. संपामुळे एसटी आणि कार्मचारी नुकसान होय. असे परब म्हणालं. कामगारांनी वेतन वाढीवर चर्चा करून आपलं वेतन वाढवून घेतले पाहिजे, असे आवाहन परबांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार

Aprna

भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

News Desk

राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदीच बांधणार !

News Desk