HW News Marathi
महाराष्ट्र

आणखी दोन राजकीय कुटुंबात जुळली सोयरीक…

बारामती | नुकतेच राज्यातील दोन दिग्गज राजकीय घराणे असलेल्या पाटील व ठाकरे यांच्या घराण्यात सोयरीक झाली. यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या राजकीय घरण्यात सोयरीक होणार आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी कन्या डॉ निवेदिता घुले यांचा साखरपुडा नुकताच दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला आहे. हे लग्न ठरल्या पासूनच पूर्ण अहमदनगर जिल्ह्यात या विवाहा बद्दल चर्चा रंगली होती.

शंकरराव गडाख यांचे पुत्र उदयन गडाख यांनी अहमदनगर येथून आपले एम बी ए चे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कन्या डॉ निवेदिता या पुणे येथील भारती विद्यापीठात आपले रेडिओ डायग्नोसिस मध्ये एम डीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. दरम्यान, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे थोरले जावई हे आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे आहेत. तर दुसरे जावई मंत्री गडाख यांचे पुत्र आहेत. त्यामुळे राज्यात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आता कौटुंबिक नातेसंबंध होऊ लागले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला येणाऱ्या काळात या नाते संबंधाचा फायदा होवू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

News Desk

तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना; अन्यथा घरभाडे बंद करणार! – बाळासाहेब थोरात

Aprna

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय…!

News Desk