HW News Marathi
महाराष्ट्र

सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी 7 ते 9 ऑगस्टला राज्यव्यापी संप

मुंबई| बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमार्फत मुंबई शिक्षक मतदार संघातून विजयाची हॅट्रीक केल्याबद्दल आमदार कपिल पाटील यांचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र. ग. कर्णिक यांच्या हस्ते आज मुंबईत सत्कार करण्यात आला.

राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि शिक्षक भारतीसह इतर समविचारी संघटनांच्या वतीने सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी येत्या 7 ते 9 ऑगस्ट 2018 रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. हा संप यशस्वी करण्याच्या तयारीसाठी समन्वय समितीची यावेळी बैठक झाली. यावेळी सर्वांनी र. ग. कर्णिक आणि आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संप यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत केला.

याप्रसंगी र. ग. कर्णिक, किशोर ठेकेदत्त, अशोक बेलसरे, मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, सरचिटणीस गजानन शेटे, आमदार निवास कर्मचारी संघटनेचे शशिकांत सकपाळ, राज्य महसूल कर्मचारी नेते वाजिद मोमीन, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलींद सरदेशमुख, सरचिटणीस अविनाश दौंड, शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे, प्रकाश शेळके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, माध्यमिक शिक्षक, ज्युनिअर/सिनिअर कॉलेज शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा, नाहीतर कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे!

News Desk

मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्याची ही वेळ नाही, संभाजीराजेंची भूमिका !

News Desk

‘माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’- बच्चू कडू

News Desk