HW News Marathi
Covid-19

नागपूरमध्ये आता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची महत्वाची घोषणा

नागपूर | राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणि पुढे होळी सण असल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत नागपूर शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र या निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार विस्कळित होऊ नये याचीही योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊन लावूनही करोनाचे आकडे काही कमी झाले नाहीत. ३ हजारांच्या पार गेलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.

या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. व्यापाऱ्यांसोबतही याबाबत चर्चा करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले आहे.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलं जाणार आहे. निर्बंध लावताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर लसीकरण केंद्रही वाढवले जाणार आहेत. सध्या दिवसाला 20 हजार लोकांचं लसीकरण केलं जातं. ते ४० हजारावर नेण्याचं लक्ष्य असल्याचं राऊत म्हणाले. शहरात कठोर निर्बंध लावण्याबाबत लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूरमधील कोरोना आणि लॉकडाऊनबाबत आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. “लॉकडाऊन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाऊन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाऊन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीआधी सांगितलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना

  • कोरोना रुग्णालये आणि बेड वाढवा,
  • स्वतंत्र कोव्हिड रुग्णालये राखीव ठेवा
  • कोव्हिड वॉर्ड बंद झाले आहेत, ते पुन्हा सुरु करा
  • बिलांवर देखरेखीसाठी ऑडिटर सुरु करा
  • हळू काम सुरु आहे, त्याचा वेग वाढवा
  • सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत, ५० पैकी ३०-३२ मृत्यू नागपूरमध्ये
  • होमक्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरतायत, त्यांना सरळ उचलून क्वारंटाईन सेंटरमध्ये न्या, त्यांच्यावर कारवाई करा
  • आयुक्तांनी फेस रेकग्नेशनबाबतची माहिती दिली, बाहेर फिरणाऱ्या लोकांना कॅमेरे ओळखतील
  • कार्यालये बुकिंग आहेत, ते रद्द केल्यामुळे पैसे मिळत नाहीत,
  • SOP ठरवा आम्ही सोबत आहोत, जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा
  • पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याचा मुद्दा समोर आला, तो योग्य आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विठू माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी २२ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

मंत्र्यांनो हवेत गोळीबार नको, आता जमिनीवर या !

News Desk

राज्यात आज 62 हजार 097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk