HW News Marathi
Covid-19

एसटीची मोफत बस प्रवास सुविधा फक्त ‘या’ दोन परिस्थितीच लागू राहणार !

मुंबई | लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मंजूर आणि कामगारांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेच्या माध्यमातून मोफत करण्याची सुविधा देण्याचा निर्णय काल (९ मे) परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केला. हा निर्णयाचा घुमजाव केल्यानंतर सरकारने अवघ्याकाही तासांतच सरकारने हा निर्णय फिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.

लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण जाणवत असलेल्या लोकांना एसटीने मोफत गावी जाता येईल म्हणून दिलासा मिळाला होता. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे मंजूर आणि कामगारांच्या गोंधळात भर पडली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात काल मध्य रात्री पत्रक काढण्यात आले. राज्य सरकारच्या आदेशानुसार, एसटीची मोफत बस प्रवास सुविधा फक्त ‘या’ दोन परिस्थितीच लागू राहणार!. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन हे पत्रक ट्वीट केले आहे.

  • इतर राज्यातील जे मंजूर व इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे व
  • महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मंजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यातून महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत आलेले आहेत. त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यपर्यंत पोचवण्याकरिता
  • या शिवाय कोणत्याही इतर प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा मोफत उपलब्द असणार नाही

लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याबाबत घोषणा केली होती. ही मोफत बस सेवा येत्या १८ मे पर्यंतच असेल, असे अनिल परब यांनी सांगितले होते. यामुळे एसटी बसच्या मोफत प्रवासासंदर्भात बदलेल्या निर्णयामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याच दिसून येत आहे.

प्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये

ज्या नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रवास करावयाचा आहे त्यांनी नोडल ऑफिसरकडून ऑनलाईन अर्ज करून अनुमतीपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर पत्र प्राप्त झालेल्यांसाठी सोमवारपासून एसटीचे नवीन पोर्टल सुरू होत आहे. त्यांनी तेथे आपल्या प्रवासाची नोंद करावी.त्यांच्या प्रवास ठिकाणानुसार त्यांचे २२-२२चे गट करून त्यांना एसटी बसेसची व्यवस्था करून देण्यात येईल. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात बसेस सज्ज ठेवाव्यात असे आदेश देऊन,प्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये,सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि महामंडळाला सहकार्य करावे,असेही आवाहन परब यांनी केले आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुंभमेळ्यातील वाढत्या कोरोनाची मोदींनी घेतली दखल, कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचे केले आवाहन

News Desk

लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाही – रोहित पवार  

News Desk

आज मशिद उघडून नमाज करणार ! मंदिरांनंतर आता इम्तियाज जलील यांचा मशिदीकडे मोर्चा…

News Desk