HW News Marathi
महाराष्ट्र

परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन; पोलिसांकडून लाठीचार्ज

मुंबई | शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी जमा झाल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला आहे. यानंतर सर्वत्र धावपळ झाली. दहावी आणि बारावी ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का?, असा सवाल विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांना केला आहे. राज्यभरात शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली, “चर्चा करू प्रश्न सोडवू, परीक्षेचा निर्णय बदलायचाअसेल तर मला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घ्यावी लागेल, असे त्या म्हणाल्या.

“राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी असून परीक्षा घेण्यास अडचणी येत असून दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. राज्यातील काही भाग हा आदिवासी आणि खेडेगावमध्ये लोक राहतात. त्यामुळे एकाच वेळी राज्यातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मोर्चे काढू नये,चर्चा करुन निर्णय घेऊ,” असे शिक्षणमंत्र्यांनी या घटनेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

धारावीमध्ये आंदोलन करण्यासाठी ऐवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यी कुठे आणि कोणाच्या सांगण्यावरून ते आले. या प्रकरणावर प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. या प्रकरणाचा शोध घेतल्यानंतर कळाले की, युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ यांनी सोशल मीडियावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत चितावणीखोर वक्तव्यकरणाऱ्या व्हिडिओ पोस्ट केला. यानंतर विद्यार्थ्यां आक्रमक होऊन धारावीत आंदोलन केले. आंदोलन करताना विद्यार्थ्यांसोबत हिंदुस्तानी भाऊ असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान! – दादाजी भुसे

Aprna

नामांकित इंग्रजी वृत्तपत्राला मलिकांची नोटीस; जाणून घ्या… काय आहे प्रकरण

Aprna

खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk