HW News Marathi
Covid-19

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस, मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

मुंबई | लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने नवीन सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लस दिली जाणार आहे. पालिकेच्या कस्तुरबा, राजावाडी, कू पर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी लस घेता येणार आहे. तसेच यापुढे ४५ वर्षांवरील नागरिकांनाही सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी नजीकच्या केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे.

पालिकेच्या आधीच्या नियमामुळे दरदिवशी जास्तीत जास्त ७ हजार लाभार्थ्यांना लस देता येत होती. तर ४५ वर्षांवरील १९ लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे पालिकेने नियमावलीत बदल करीत ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोविशिल्डची पहिली व दुसरी लस घ्यायची आहे अशा नागरिकांना सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी थेट लस घेता येईल.

यात अपंगांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनाही कोविशिल्ड लसीचे डोस घेता येईल. स्तनदा माता यांनाही या लशीचा थेट लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० टक्के लसीकरण हे कोविन एॅपवर नोंदणी करून लसीकरण केंद्र व वेळ निश्चित केल्यानंतरच के ले जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका कोरोना रुग्णामुळे बीड शहरासह १२ गावांमध्ये पुढील आठ दिवस संचारबंदी

News Desk

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४६ हजाराहून अधिक, तर मृतांची संख्या १५६८ वर पोहोचली

News Desk

पुण्यात सलून-ब्युटी पार्लरकरिता पाळावेच लागणार ‘हे’ नियम

News Desk