पुणे | सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला भीमा-कोरेगाव हिंसाचार याप्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात सांगितले असून आम्ही लवकरच न्यायालयासमोर ते सादर करू. यशस्वीरित्या हा तपास आम्ही पुर्ण करू असा विश्वास पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशन व्यक्ती केला आहे.
We are doing an analysis of items recovered during the searches. The Supreme Court has asked us to file a detailed affidavit and we will do so. We will take the investigation to a logical end: Dr K Venkatesham, Pune Police Commissioner on #BhimaKoregaon violence case pic.twitter.com/pX1UJS4Hb0
— ANI (@ANI) August 30, 2018
भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून देशभरात छापे टाकून पुणे पोलिसांनी ५ जणांना अटक केले होते. सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फेरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव या पाच जणांना पोलिसांनी अटक केले आहे. या सर्वांच्या घरातून लॅपटॉप, हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह, पुस्तके अशा विविध गोष्टी पोलिसांनी या पाच व्यक्तींच्या घरातून जप्त केले आहे. या सर्व साहित्याचा आम्ही तपास करत असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशन यांनी दिली आहे.
या पाच जणांना पोलीस कोठडीत न ठेवता त्यांच्या घरी नजरकैद (हाऊस अरेस्ट) ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (२९ ऑगस्ट)ला दिले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत नजर कैदेतठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या या आदेशाने पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.
पंतप्रधानांच्या हत्येचा कट
पुणे पोलिसांनी या पाच व्यक्तींच्या घरी छापे टाकल्यानंतर तपासात मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. बंदी असलेल्या माओवादी संघटनांनी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.