नवी दिल्ली | भीमा-कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत नजर कैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव या पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. तर न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते सुद्धा भारद्वाज यांच्या ट्रान्झिट रिमांडलाही स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालनाने महाराष्ट्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितले आहे. तसेच फडणवीस सरकारला न्यायालयाने नोटीस देखील बजावली आहे.
Supreme Court directs to keep the five accused under house arrest till September 5. #BhimaKoregaon https://t.co/Jcbt1YhvN2
— ANI (@ANI) August 29, 2018
नेमके प्रकरण काय
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. यापूर्वीही एल्गार परिषदेशी संबंधित सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. याबाबत कबीर कलामंचावर देखील पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Supreme Court is hearing the petition of Romila Thapar, Prabhat Patnaik, Satish Deshpande and others against the arrest of activists Sudha Bhardwaj and activist Gautam Navlakha in #BhimaKoregaon matter. https://t.co/xNoCZ8L0em
— ANI (@ANI) August 29, 2018
पंतप्रधानांच्या हत्येचा कट
पुणे पोलिसांनी या पाच व्यक्तींच्या घरी छापे टाकल्यानंतर तपासात मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. बंदी असलेल्या माओवादी संघटनांनी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली.
Supreme Court observes, 'dissent is the safety valve of democracy. If dissent is not allowed then the pressure cooker may burst'. #BhimaKoregaon
— ANI (@ANI) August 29, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.