HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरेंचे असे आहे ‘शॅडो कॅबिनेट’

मुंबई | मनसेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा आज (९ मार्च) पार पडला आहे. यानिमित्ताने मनसेने त्यांच्या बहुचर्चित अशा शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. यामनसेनेच्या शॅडो कॅबिनेटला ‘प्रतिरुप मंत्रिमंडळ’ असे नाव देत असल्याचे अनिल शिदोरे ठाकरे सरकारवर नजर ठेवणाऱ्या पक्षातील नेत्यांची घोषणा दिली आहे. यात ठाकरे सरकारवर नजर ठेवण्यासाठी यांनी कॅबिनेटची निर्मित केली आहे. नुकतेच राजकारणात प्रवेश केलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिरंजीव अमित ठाकरे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मनसे वर्धापन दिन नवी मुंबईतील वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला होता.

दरम्यान, महाविकासआघाडीमधील आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण, पर्यटन, मराठी भाषा-राजशिष्टाचार ही खाती आहेत. शॅडो कॅबिनेटमध्ये पर्यटन आणि मराठी भाषा खात्याची जबाबदारी आदित्य ठाकरेंचं चुलत भाऊ अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय अमित ठाकरे यांच्याकडे ग्रामविकास, नगरविकास, मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान, मदत पुनर्वसन, वने विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटला दिल्या ‘या’ सूचना

यावेळी शॅडो कॅबिनेटमध्ये मनसेच्या नेमलेल्या नेत्यांनी कुणीही आपली स्वतःची व्हिजिटिंग कार्ड छापू नये, कुणीही स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यावर भूमिका मांडू नये, आपल्याला दिलेल्या पदाचा गैरवापर करु नये, शॅडो मंत्र्यांनी ब्लॅकमेलिंग करु नये, तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या दिलेल्या खात्याचा तसेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर होणाऱ्या निर्णयांचा सखोल अभ्यास करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

मनसेचे शॅडो कॅबिनेट

  • गृह, विधी-न्याय – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम,
  • मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान – अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
  • वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
  • महसूल आणि परिवहन – अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
  • ऊर्जा – शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
  • ग्रामविकास – जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे
  • मदत पुनर्वसन, वने – संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
  • शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
  • कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
  • नगरविकास, पर्यटन – संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
  • सहकार पणन – दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये
  • अन्न व नागरीपुरवठा – राजा चौघुले, महेश जाधव
  • मत्स्यविकास – परशुराम उपरकर
  • महिला व बालविकास – शालिनी ठाकरे
  • सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) – अभिजीत सप्रे
  • सार्वजिन उपक्रम – संजय शिरोडकर
  • सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता
  • सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार – अमेय खोपकर
  • कौशल्य विकास – स्नेहल जाधव

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ

swarit

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोना बळी,तर राज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू

News Desk

‘ए भाई’ अमृता फडणवीस मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांवर का भडकल्या ?

News Desk