HW News Marathi
महाराष्ट्र

“तपास यंत्रणा चुकत असतील तर न्यायव्यवस्था त्यांना फोडून काढेल”- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनीही आर्यन खान प्रकरणात आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार असल्याचं सांगितलंय. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. तसेच तपास यंत्रणा चुकत असतील न्यायव्यवस्था निर्णय घेईल असंही ते म्हणाले. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीवर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणारवर येऊन ठेपल्याचं पाहायला मिळाला आहे.

ड्रग्जमुळे महाराष्ट्र देश बदनाम होतो त्यांचं यांना घेणं देणं नाही

ड्रग्सचा आरोप असलेल्या तरूणाला वाचवण्यासाठी राज्य सरकार सगळी शक्ती पणाला लावतंय असा आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, या राज्यातल्या तरुणांना दीशा देण्याची जबाबदारी आहे, ते या ड्रग्ज प्रकरणातील तरुणाला वाचवताय, आणि केंद्रीय यंत्रणांना दोष देण्याचं काम करताय असंही ते म्हणाले. ड्रग्जमुळे महाराष्ट्र देश बदनाम होतो त्यांचं यांना घेणं देणं नाही, आणि महाराष्ट्र बदनाम होण्याबद्दल बोलताय असंही ते म्हणाले.एनसीबीच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या या वादावर बोलताना भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय गोष्टी समोर येतात हे पाहावं लागणार आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांवर झालेल्या आरोपांवर ते म्हणाले की, “जर तपास यंत्रणांनी चुकीचं काम केलं तर न्यायव्यवस्था न्यायाच्या चाबकाने त्यांना फोडून काढेल.” दरम्यान, आज या प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप केलेल्या प्रभाकर साईलने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनपा निवडणुक मनसेसाठी प्रतिष्ठेची

News Desk

आजोबा- नातूमधील वाद संवादात आम्ही काय बोलावं… हा त्यांचा घरचा प्रश्न आहे – फडणवीस

News Desk

अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा, नाहीतर कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे!

News Desk