HW News Marathi
महाराष्ट्र

“आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका”, मुनगंटीवारांचा नाना पटोलेंना टोला

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला. भाजपच्या आक्रमक बाण्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले. ‘महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, पण देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल, अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही’ अशी ऑफरच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. इतकंच नाही तर सभागृहात यावेळी मुनगंटीवारांनी नाना पटोले आणि गृहमंत्र्यांनाही टार्गेट केले.

सभागृहात मुनगंटीवार बोलत असताना महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मध्येच बोलायला उभे राहिले असता ‘आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका’ असा सणसणीत टोलाच मुनगंटीवार यांनी लगावला होता. त्यानंतर अनिल देशमुख बोलायला उभे राहिले, ‘मुनगंटीवार यांनी सगळ्या मंत्र्यांची नावं घेतली. पण तुम्ही देवेंद्रजींपेक्षा सीनियर होतात पण मुख्यमंत्री ते झाले. तुमच्या मनातलं दुःख मला कळत होतं. तुम्ही खोटं हसून ते सांभाळत होतात. तुम इतका क्यू मुस्करा रहे हो ? क्या गम है जिसको छुपा रहे हो’ असा टोला अनिल देशमुख यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा आणि लोकलचं तिकीट मिळवा!’

Jui Jadhav

“आम्हाला युतीत कोणीही नको”, चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं विधान

News Desk

‘मुका’ घेण्याचं वक्तव्य महागात, रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार!

News Desk