HW News Marathi
महाराष्ट्र

फेसबुकवर पोस्ट टाकून मराठा तरुणाची आरक्षणासाठी आत्महत्या

औरंगाबाद | राज्यभर सुरु असलेल्या मराठा आंदोलनाला दिवसेंदिवस वेगळे वळण प्राप्त होताना पहायला मिळत आहे. औरंगाबादच्या गोदावरी नदी पात्रात काकासाहेब शिंदे यांनी उडी मारुन जल समाधी घेतल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते.

पुन्हा एकदा औरंगाबादच्या मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. प्रमोद होरे पाटील (वय २८ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रमोद यांनी फेसबुक अकाऊंटवर ‘चला आज एक मराठा जातोय पण काही तरी मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ आपला प्रमोद पाटील’, अशी पोस्ट अपलोड करून मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर औरंगाबादमध्ये एकच औरंगाबादमध्ये खळबळ माजली आहे.

रविवारी दुपारपासून प्रमोद पाटील गायब होते. आईवडील व मित्रांनी त्यांचा शोध घेतला. संध्याकाळी प्रमोदच्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुकवर आत्महत्ये संदर्भातील त्यांची पोस्ट पाहिली. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे रुळाजवळ उभा राहून प्रमोद यांनी फोटो काढून फेसबुकवर तो अपलोड केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित सादर करावा; राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

News Desk

राहुल गांधींचा नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

News Desk

“विरोधी पक्षाविरोधात मोठे कारस्थान किंवा डाव रचला जात आहे का?”, संजय राऊतांचा राज्य सरकारला सवाल

Aprna