HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची बैठक

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची बैठक होणार आहे. तिन्ही पक्ष आपल्या आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची आज ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. शिवसेना प्रमुख या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांची मतं पक्षप्रमुख जाणून घेणार आहेत. तसेच मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आणि त्यासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या स्वतंत्र बैठका पार पडल्यानंतर दोन्ही पक्षांची एकत्र बैठकही होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा. त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी तुम्हाला शब्द देतो…,” उद्धव ठाकरे त्या महिलेशी नेमकं काय बोले?

News Desk

…तर सत्तेची आसने खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत !

News Desk

‘मग याचे श्रेय कुणाला द्यायचे?’, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk