मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआय टीम करत आहे. दरम्यान, सीबीआय सुशांतसिंग राजपूत याच्या घरी तपासासाठी गेली होती. सव्वा तास सीबीआयची टीम पुन्हा एकदा सुशांतसिंह याच्या घरी तपास करत होती. यावेळी सुशांतची बहिण मितू सिंह उपस्थित होती.
दरम्यान, ड्रग्ज कनेक्शनबाबतच्या चौकशीसाठी शोविक चक्रवती आणि सॅम्युअल मिरांडा यांना सात दिवसांची कोठडी व्हावी अशी एनसीबीने मागणी केली आहे.कोर्टाने ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली आहे. वकिल मानेशिंदे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर रिया चक्रवर्तीची उद्या होणार चौकशी होणार आहे. याबाबत एनसीबीकडून आज (५ सप्टेंबर) समन्स पाठवणार आहे.
Mumbai: Narcotics Control Bureau seeks 7-day custody of Showik Chakraborty & Samuel Miranda, also seeks judicial custody of Kaizen Ibrahim
Showik Chakraborty & Samuel Miranda are being presented before the Esplanade Court, in connection with Sushant Singh Rajput death case https://t.co/wiNNzWRVa1
— ANI (@ANI) September 5, 2020
ड्रग्ज कनेक्शन तपासात काय आले समोर
– केपीएस मल्होत्रांची एनसीबी तपासात महत्त्वाची भूमिका
– पुराव्यावरूनच शौविक, सॅम्युअल मिरांडा यांची अटक
– दोघांबाबत डिजिटल पुरावे मिळाले
– याप्रकरणी छाप्यात पैसेही सापडले
– जैद आणि त्याचे साथीदार लॉजिस्टिक चेनमध्ये सहभागी
– ड्रग्ज आणि ड्रग्जचा काळाबाजार कुठे आहे हे तपासणार
– शौविक, सॅम्युअलने दिलेल्या माहितीच्या आधारे पुढची पावलं
– केवळ बॉलिवूड टार्गेट नसून जे ड्रग्ज खरेदी करतात तिथेही लक्ष देणार
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.