HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेही कोरोनामुक्त

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तटकरे यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. २७ ऑक्टोबरला सुनील तटकरेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली होती.

“मला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून काही दिवस मी विलगीकरणात राहणार आहे. आपल्या शुभेच्छांमुळे प्रकृती उत्तम असून या काळात माझी काळजी घेणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. या कोविड योद्ध्यांच्या सेवावृत्तीला व कार्याला माझा सलाम!” असं ट्वीट खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांची ‘ही’ ऑफर माजी पोलिस अधिकारी जुलिओ रिबेरो यांनी नाकारली

News Desk

कर्जत नगरपंचयात निवडणुकीत रोहित पवारांचे वर्चस्व; १७ पैकी १२ जागांवर विजयी

Aprna

वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही !

News Desk