HW News Marathi
महाराष्ट्र

“आता मी भाजपला ताकद दाखवतो”, खडसेंची भाजपविरुद्ध गर्जना

जळगाव | एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीत इनकमींग सुरुच आहे. भाजपचे अनेक कार्यकर्त्याने भाजप सोडून राष्ट्रवादीत आले. यावरुन आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे.

आज )२ नोव्हेंबर) जळगावात भाजपच्या ६० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रावेर तालुक्यातील ६० भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर कोणीही भाजप सोडून जाणार नाही. जे हौशे-गवशे असतील तर तेच जातील. कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नाही, असे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भाजपमधून किती जण एक्झिट करत राष्ट्रवादीत एन्ट्री करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही ही फक्त चर्चा आहे – पंकजा मुंडे

News Desk

आरोग्य विभागाच्या भरती, खुल्या किंवा ‘ईडब्ल्यूएस’तून एसईबीसीची पदे भरली जाणार

News Desk

महाविकासआघाडीतील वादाचा नवा अध्याय!

News Desk