HW Marathi
महाराष्ट्र

एसटी चालक संतोष मानेची फाशी रद्द, आता सुनावली जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली | पुण्यातील स्वारगेट येथून एसटी बस चोरून ती बेदरकारपणे चालवत ९ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मानेला पुण्यातील सत्र न्यायालयाने एप्रिल २०१३ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला माने यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान धाव घेतली होती.

माने यांनी शिक्षा कमी करण्याची अपील दाखल केली होती. या अपिलावर आज (९ जानेवारी) सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा कमी करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मानेने ९ जणांचा बळी घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाचा बडतर्फ चालक संतोष माने केले होते.

कधी घडली होती घटना

२५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट एसटी बस स्थानकातून बस पळवून नेली आणि भर रस्त्यात बेफाम चालवली. त्यात त्याने ४५ पेक्षा जास्त वाहनांना धडक दिली. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जण जखमी झाले होते. तसेच मानेनी ४५ पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली होती.

घटनेत मरण पावलेल्या व्यक्ती 

पूजा भाऊराव पाटील (वय १९), राम ललीत शुक्ला (वय २५), शुभांगी सूर्यकांत मोरे, पिंकेश खांडेलवार, अंकुश तिकोणे (वय ४६), अक्षय प्रमोद पिसे, मिलिंद पुरुषोत्तम गायकवाड, श्वेता धवल ओसवाल आणि चांगदेव भांडवलकर या ९ जणांना मानेनी चिरडले होते.

 

Related posts

राज्य सरकारकडून कांद्याला प्रति क्विंटलमागे २०० रुपये अनुदान जाहीर

News Desk

रेल्वेतून चालते विषारी सापांची तस्करी

News Desk

विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी

News Desk