HW News Marathi
देश / विदेश

कोकणात मदतीसाठी ‘नेव्ही रेस्क्यू फोर्सची’ आवश्यकता, सुप्रिया सुळेंची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

मुंबई | कोकणात सततच्या पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागात नुकसान झालं असून लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. बचावकार्य सुरु झालं असून, पाणी ओसरत असल्याचं समजत आहे. अनेक नेत्यांनी कोकणावर आलेल्या या भयंकर परिस्थिती साठी मदतीचा हाथ पुढे केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या सह पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून केंद्रीय संरक्षण मंत्री मा.राजनाथ सिंह जी यांची भेट घेतली आहे.

‘नेव्ही रेस्क्यू फोर्स’ तैनात

कोकणावर ओढवलेल्या या भीषण परिस्थितीत लोकांना मदत वेळीच मिळावी म्हणून नेव्ही रेस्क्यू फोर्स चिपळुणात पाठवण्यात येण्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती त्यांच्या ट्विटर द्वारे शेअर केली आहे. ‘महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात पूरस्थिती आहे.येथे मदत पोहोचविण्यासाठी ‘नेव्ही रेस्क्यू फोर्स’ ची आवश्यकता आहे.यासंदर्भात शिवसेनेचे राज्यसभा खासदार श्री अनिलजी देसाई यांच्यासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री मा.राजनाथ सिंह जी यांची भेट घेतली’, अशी माहिती त्यांच्या ट्विटर द्वारे मिळाली आहे.

 

चिपळूणमध्ये पूर परिस्थिती

चिपळूण शहरात काल (२२ जुलै) अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिपळूणवासियांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या वेळात रिमझिम पाऊस सुरु आहे.

चिपळूण शहरात २०२ मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये २००५ पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.

महाडमध्ये दरड कोसळली

कोकणात सतत ३ दिवस जोरदार पाऊस पडत आहे. महाड मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाडमधील तळई गावातील तब्बल ३० हून अधिक घरांवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या दुर्घटनेत येथील तब्बल ७० ते ७५ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळते. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राहुल गांधी न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असेल”, पीडितेच्या आईवडिलांना राहुल गांधींचं आश्वासन

News Desk

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

swarit

केंद्र सरकारने नाकारली केरळसाठी यूएईची मदत

Gauri Tilekar