HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर सुप्रिया सुळे भडकल्या म्हणाल्या….

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आज (२५जून) ईडीने छापेमारी केली आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. आणि यापूर्वी देखील सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.ईडीने केलेल्या या कारवाईवर सुळें चांगल्याच संतापल्या आहेत.

देशातील यंत्रणांचा इतक्या प्रमाणात गैरवापर होताना कधीही पाहिलं नव्हतं, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी भाजपवर केला आहे. केंद्रिय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतंय. तसेच ईडीची कारवाई आणीबाणीची आठवण करुन देणारी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात हजर होते.

काय आहे प्रकरण?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे.

११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या

Aprna

सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार

News Desk

येत्या आठवड्याभरात शरद पवारांशी चर्चा करून विधानपरिषदेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ | राजू शेट्टी

News Desk