HW News Marathi
Covid-19

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

पुणे | राज्यात कोरोना काही अंशी आटोक्यात आला असला तरी कोरोना नियमांचे पालन सर्वांनी करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली होती. त्यावेळी काही कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी जमले होते. त्यातील काही जणांच्या तोंडावर मास्क नसल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली आहे.

कोरोना अजूनही पुर्णपणे संपलेला नाही. आता सगळं सुरु झालं आहे. काही सेवा सुरू करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी परवानगी दिली आहे. गाडी काढा आणि फिरा असं करु नका. जरा अजून काही महिने दम धरा. सध्याची स्थिती ही सेलिब्रेशन करण्याची वेळ नाही. जबाबदारीने वागा. बाहेर निघताना मास्क लावा. तसेच मास्क काढून बोलून नका, असं सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

अजित दादा एक सेकंदही मास्क काढत नाहीत. अजित पवारांचं सगळं ऐकता मग अजितदादांचे कोरोनाचे नियम का ऐकत नाही? कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी जास्त पाळा. सव्वा वर्षात किती जणांनी दादाचा चेहरा बघितलाय?, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे. तर नियम न पाळणाऱ्यांचं तिकीटच कापण्यात येईल, असं देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर काय बोल्या सुप्रिया सुळे?

दरम्यान, त्यावेळी उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की, राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. एखाद्या विषयावर पवार साहेब एकदा बोलले की, त्या विषयावर आम्ही कोणी बोलत नाही.

पुणे जिल्हा परिषदेला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी सुळे यांनी प्रशांत किशोर व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बैठकीबाबा बोलताना मी प्रत्यक्ष त्या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे त्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही असे म्हणाल्या. तुम्हाला ही असंच वाटतं का ? उद्धव हेच ५ वर्ष मुख्यमंत्री पदी कायम राहतील का ? राष्ट्रवादी दावा क्लेम करणार ? या प्रश्नावर सुळे यांनी ५ वर्षे महाविकास आघाडी सरकार टिकणार हे पवार साहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर एकदा पवार साहेब बोलले की आम्ही कुणी बोलत नाही असे स्पष्टपणे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला ६० लाखांचा टप्पा

News Desk

राज्यात २,९४० नवे कोरोनाबाधित तर ८५७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

गुजरातमध्ये स्मशानात मृतदेहांची चेंगराचेंगरी सूरू, महाराष्ट्राने यातून धडा घ्यावाच! – सामना

News Desk