HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडल्या डोंबिवलीकरांच्या समस्या

मुंबई | लोकसभेतील शून्य प्रहरामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकलचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत मांडला. यावेळी सुळे लोकसभेत म्हटल्या की, मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानकात म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. मात्र, ही गर्दी सामावून घेण्यासाठी रेल्वेच्या सेवा अपुऱ्या पडल असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

यासंदर्भात डोंबिवलीकर गेली अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे त्यांच्या समस्या मांडत आहे. मात्र, प्रशासनाकडून त्यांच्या मागण्या गंभीऱ्याने घेतल्या दिसूत नाही. परंतु,  सुप्रिया सुळेंनी डोंबिवलीकरांचे प्रश्न थेट लोकसभेत मांडल्यामुळे आता रेल्वे मंत्रालय कोणते पाऊल उचलणार हे पाणे औसुक्याचे ठरणार आहे.

तसेच सुप्रिया सुळेंनी लोकसभेत लोकलचा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील पत्र ट्वीट करुन माहिती दिली. डोंबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी संसदेत केली. डोंबिवली स्थानकातून दिवसभरात मुंबईसाठी ३३ लोकल सुटतात, मात्र त्यापैकी फक्त दोन फास्ट लोकल आहेत. डोंबिवली स्थानकातून दिवसभरात जवळपास ८५० लोकल मुंबईकडे जातात, मात्र या लोकल कल्याणहून खचाखच भरून येत असल्याने डोंबिवलीकरांना त्यात जाण्यासाठी जागा मिळत नाही.

 

 

Related posts

मोदी ज्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खिशातून आम्ही न्याय योजनेसाठी पैसे आणणार !

News Desk

भाजपचे दक्षिणेतील पहिले मुख्यमंत्री

News Desk

अनेक शाळा फी वाढीच्या प्रयत्नात, सरकारने तातडीने लक्ष द्यावे !

News Desk