HW News Marathi
महाराष्ट्र

“धनंजय मुंडेंनी पारदर्शक बाजू मांडली”, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी बलात्काराचे आरोप करुन तक्रार दाखल केली होती. ही तक्रार त्या महिलेने आज पाठीमागे घेतली आहे. यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरमध्ये एबीपी माझाशी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हनी ट्रपचे आरोप करणे अशी प्रकरण महाराष्ट्रात होणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलिस तपास करत होते. आणि धनंजय मुंडे यांनी पारदर्शक बाजू मांडली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं आहे. त्यामुळे आता तरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे सत्र संपले आहे. आणि राष्ट्रवादी पक्ष ठामपणे मुंडेंच्या मागे उभे आहेत ते दिसून आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!”, चाकणकरांचा फडणवीसांना टोला

News Desk

बहुजन समाजाच्या नेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला या प्रकरणावरुन खुप त्रास झाला – अजित पवार

News Desk

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

News Desk