HW News Marathi
Covid-19

“दादा लढवय्ये आहेत”, अजित दादांना कोरोना झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट!

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.”माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे”असे ट्विट अजित पवारांनी केले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक जण ते बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी दादा लढवय्ये आहेत,ते बरे होतील अशा आशयाची भावूक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत.महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन ते लवकरच सर्वांच्या सोबत येतील.दादा,लवकर बरे व्हा, असे ट्विट सु्प्रिया सुळे यांनी केले आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लवकरच ते बरे होतील कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार त्यांच्या घरी विलगीकरणात होते. नियमित तपासणीसाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरुन जावू नये. लवकरच ते बरे होतील आणि महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही अजित पवार लवकर बरे व्हावे म्हणून प्राथना केली आहे. तसेच, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही दादा लवकर बरे व्हा, असे ट्विट करत म्हटले आहे.

 

https://twitter.com/rajeshtope11/status/1320641200286691328?s=19

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेश टोपे यांनी लॉकडाऊन ४ कसा असेल याचा दिला अंदाज

News Desk

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत अमित शहा यांची लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

News Desk

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून पत्र लिहित सांत्वन

News Desk