HW News Marathi
देश / विदेश

केंद्राने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसच्या किंमतीबाबत दाखवावी, सुळेंचा टोमणा

नवी दिल्ली | अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अवघ्या काही तासांत मागे घेतला. यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना नेटकऱ्यांच्या, राजकारण्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार व्यक्त केले. सोबतच इंधन आणि गॅस दरवाढही मागे घेण्याची विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

“अल्प बचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

 

आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आल्याची घोषणा बुधवारी रात्री करण्यात आली होती. त्यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला होता. परंतु गुरुवारी सकाळी हा निर्णय मागे घेण्याची अधिकृत घोषणा सीतारमण यांनी केली. त्यामुळे व्याजदर हे जैसे थे राहतील.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

दरम्यान, वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतय? आणि या मंत्रालयाने शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता? नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की कोरोना संदर्भातील आर्थिक पॅकेज? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

दर तीन महिन्यांनी व्याजदर बदल

अल्प बचत योजनांचे नवीन व्याजदर तीन महिन्यांनी सरकारकडून बदलले जातात. बर्‍याच वेळा असे घडते की, जुने व्याज दरच कायम ठेवले जातात. यंदा व्याजदरामध्ये मोठा बदल करण्यात आला होता. २०२०-२१ आर्थिक वर्षातील शेवटची तिमाही संपल्यामुळे ३१ मार्चला नवीन व्याजदर जाहीर करण्यात आले होते, परंतु एक एप्रिलला हे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राष्ट्रीय ग्राहक दिन

News Desk

१५ ऑक्टोबरपासून देशांत शाळा सुरु होणार, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स…

News Desk

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधानांना बांधली राखी! मागितलं ‘हे’ बक्षीस

News Desk