HW News Marathi
देश / विदेश

सुशांतचे वडील म्हणतात, सुशांतने आत्महत्या केलीही असेल !

मुंबई । दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील नव्या नव्या खुलाशांमुळे या प्रकरणाला वारंवार नवी वळणे मिळत आहेत. त्यातच आज (३ सप्टेंबर) सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी एक नवे विधान केले आहे. के.के सिंह म्हणाले की, “सुशांतने नैराश्यामध्ये आत्महत्या केली असावी. माझी सुशांतच्या आत्महत्येबाबत कोणाही विरोधात तक्रार नाही. माझा कुणावरही संशय नाही.” दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप आणि संशय व्यक्त केल्यानंतर नेमके आता सुशांतच्या वडिलांनी असे विधान का केले ? हा एक मोठा प्रश्न सर्वांपुढे आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे तपासाची दिशा बदलणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटना येथील राजीव नगर येथील पोलिस ठाण्यात सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुंटुबियावर आरोप करत संशय व्यक्त केला होता. रिया चक्रवर्तीमुळे सुशांतने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, आता या प्रकरणी आपला कोणावरही आरोप संशय नसल्याचे सुशांतचे वडील सांगतात. ‘एनडीटिव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार के.के. सिंह यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती दिल्याचे वृत्त आहे. ते म्हणाले होते की,”मला माहित नाही की माझ्या मुलाने आत्महत्या का केली. त्याने कधीही आपल्या नैराशाबाबत चर्चा केली नव्हती. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत माझी कोणतीही तक्रार नाही तसेच कुणावरही संशय नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय; ज्ञानेश्वर म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

Aprna

शरद पवारांनीच केला मोदींसोबतच्या भेटीचा खुलासा

News Desk

पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !

News Desk