HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या की आत्महत्या? सस्पनेन्स अजूनही कायम…

मुंबई | गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये बॉलिवू़ अभिनेता सुशांतसिंग राजपूतयाचा मृतहेह वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीसह राजकारणीही हळहळले. यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरु झाला. ही हत्या होती की आत्महत्या यावरुन राजाकराण सुरु झालं. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्‌यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

गेल्या वर्षी १४ जूनला अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचे वडील, बहिणी यांचे जबाब नोंदवले हाेते. सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. इतकंच नाही तर सुशांतसिंगची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली होती.

सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांचा तपास थांबला आहे. अशात, मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी, एनसीबी आणि सीबीआय या पाच यंत्रणांनी तपास करूनही वर्षभराने सुशांतने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय काेणत्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसांत धाव घेतली. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली. प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आणि ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा सामना रंगला होता.

सुशांत सिंह राजपूत यानं वर्षभरापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. मुंबई पोलिसांशिवाय या आत्महत्येच्या तपासासाठी बिहार पोलीस, सीबीआयही पुढं आली. यानंतर सदर प्रकरणी अनेक धागेदोरे मिळत गेल्यामुळं ईडी आणि एनसीबी या यंत्रणांनीही त्यांच्या परिनं याचा तपास सुरु केला होता. ज्यामध्ये सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियावर काही गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्षभरानंतरही या प्रकणारची चर्चा सुरुच आहे.

काय म्हणाले होते पार्थ पवार?

तसेच या प्रकरणात सीबीयाने तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी केली होती. यावरुन पवार कुटुंबीयांत एक वेगळाच वादंग निर्माण झाला होता.“सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी होत होती. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे गृहमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, “अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी ही संपूर्ण देश आणि विशेषत: देशातील तरुणांची भावना आहे. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना अशी विनंती केली आहे कि, ही राष्ट्रीय भावना विचारात घेऊन या प्रकारची सीबीआय चौकशी सुरु करावी”, अशी माहिती पार्थ पवार यांनी स्वतःच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

आदित्य ठाकरेंवर आरोप

दरम्यान, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणी नाव न घेता युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरेंवर आरोप केले आणि सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव जोडलं जाऊ लागलं.या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत, आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळून लावले होते.

बिहार पोलिसांच्या चौकशीवरून राजकारण

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसात रियाविरोधात गुन्हा दाखल केला.

सुशांत मृत्यूप्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं होतं. बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली. बिहार पोलिसांना चौकशीचा अधिकार काय असा प्रश्न उपस्थित केला. सुशांत चौकशीवरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा सामना रंगला होता. पाच यत्रणांनी तपास करूनही सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय काय निष्कर्षापर्यंत पोहोचतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी एकदिवसीय उपोषण

News Desk

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा! – मुख्यमंत्री

Aprna

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले – निलेश राणे

News Desk