HW News Marathi
महाराष्ट्र

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला स्थगिती

मुंबई | मराठा आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दिड वर्षापासून विविध प्रकारे मराठा समाजातील लोक आंदोलन करताना पहायला मिळत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून वारंवार ठिय्या आंदोलनाला महाराष्ट्रात सुरुवात झाल्याचे पहायला मिळत होते. आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने ५८ मुक मोर्चे मुंबईसह महाराष्ट्रभरात काढल्यानंतरही सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली.

याच रागातून संतापलेल्या मराठ्यांनी मुक नाहीतर ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे २४ जुलै आणि २५ जुलै रोजी मुंबईसह महाराष्ट्र भरात आंदोलन पेटले होते. या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटलेले पहायला मिळाले. दरम्यान २ आंदोलकांनी आत्महत्या करुन जीव देखील गमावले. त्यामुळे हा बंद अधिक तीव्र झाला होता.

राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळले त्यामुळे काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आज मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. तसेच पालघर, रायगड येथेही उद्या बंद पुकारण्‍यात आला होता. मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्‍या समन्‍वयकांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला होता. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.

मुंबईतील आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होताना दिसताच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बंद स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन तशी अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणबंदी घातली तर…राणेंचा सरकारला इशारा !

News Desk

मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास सुरू

News Desk

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”, शालिनी ठाकरेंचा सवाल

Jui Jadhav
राजकारण

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन

News Desk

औरंगाबाद | मराठा आरक्षणाच्या मुद्दावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले आहेत. मराठे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपचे अनेक नेते हे मराठा समाजातील असल्यामुळे त्यांच्या विरोधात मराठे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आमदारांना लक्ष्य केले जात असताना कन्नडचे आमदार मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत.

दुपारपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अन्यथा मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, अशी घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढणे सरकारला सहज शक्य आहे. मंत्री पंकजा मुंडे एका दिवसात ५० अध्यादेश काढू शकतात तर हा एक अध्यादेश काढणे त्यांना का शक्य नाही?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Related posts

आता राज्याच्या आरोग्य खात्याचा अधिभार एकनाथ शिंदेंकडे 

News Desk

‘शिवसेनेची अयोध्येत कितीशी ताकद आहे ?’

Gauri Tilekar

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk