HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सदाभाऊ खोत यांच्या कार्यक्रमात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ

पुणे | कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यशाळेत बोलत असताना, शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे काही काळी कार्यक्रम रखडला होता. कार्यक्रमाची परिस्थिती पहाता खोत यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचे सांगितले. खोत पुढे असे देखील म्हणाले की, “मी देखील चळवळीतून पुढे आलो आहे. मला शेतकऱ्यांच्या समस्या चांगल्या महिती आहे.”

कार्यक्रमातील गोंधळ पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्यांना सभागृहातून बाहेर काढले. पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चतुशृंगी पोलिसांनी पूजा झोळे, अजिंक्य नागटीळकर, सूरज पवार, सूरज पंडित, सौरभ बळवडे आदीना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री डॉ. अनिल बोडे होते. व्यासपीठावर माधव भंडारी, किशोर तिवारी, केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष भुतांनी, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

 

Related posts

शहीद मेजर शशीधरन नायर यांच्‍या पार्थिवावर लष्‍करी इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

#LokSabhaElections2019 : उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

News Desk

#LokSabhaElections2019 : थोड्याच वेळात जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी

News Desk