HW News Marathi
महाराष्ट्र

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड, फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द 

मुंबई | एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते.

आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने सॅनिटायझर टनेलची केली निर्मिती !

News Desk

सुरक्षा कमी करण्याचा  निर्णय हा सरकारचे “खुजेपण” दाखवणारा – मनसे 

News Desk

हेलिकॉप्टरमुळे लोकसभेचं तिकीट गेलं! सुजय विखेंच्या या आरोपात तथ्य नाही,राष्ट्रवादीने दिले उत्तर

News Desk