HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई । राज्यात गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. महाविकासआघाडीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. हॉटेल ट्रायडंटमध्ये काल (२६ नोव्हेंबर) महाविकासआघाडीची संयुक्त बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ उद्या (२८ नोव्हेंबर) संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा शिवातिर्थावर पार पडणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. ज्यांच्यावर ३० वर्ष ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांच्याविरोधात ३० वर्ष लढतो ते मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपर टीका केली.

तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला संघर्षाच्या वेळी नाही तरी संघर्षातून विजय मिळाल्यावर बाळासाहेब यांची आज आठवण येते. जीवनात कमावले काय आणि गमावले ते काय हे आज समजले, असेही ते यावेळी म्हणाले. आपले सरकार हे एक कुटुंब आहे . सर्व सामान्य माणसाला माझे सरकार आहे असे वाटले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नाही, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल – प्राजक्त तनपुरे

News Desk

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Aprna

कवठेमहांकाळमध्ये रोहित आर आर पाटलांचा दणदणीत विजय; १७ पैकी १० जागा जिंकत एकहाती सत्ता

Aprna