HW News Marathi
देश / विदेश

आरबीआयकडून दिलासा, नाबार्ड, लघुउद्योग, नॅशन हाऊसिंग बँकांसाठी ५० हजार कोटींची मदती

नवी दिल्ली | देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे जगभरात जागतिक मंदीचे सावट असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे कोरोनाच्या पाश्वभूमीवर दास यांनी आज (१७ एप्रिल) १० वाजता पत्रकार परिषद घेतली असून यावेळी त्यांनी बाजारात चलन तुटवडा जाणवू नये, म्हणून ५० हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीची घोषणा केली.

आहे. यावेळी बँक, वित्ती संस्थांतल्या कर्मचारऱ्यांचे शक्तीदांत दास यांनी आभार मानले असून कोरोनाचा मुकाबलाकरण्यासाठी आरबीआयचे सर्व प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरबीआने रिव्हर्स रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली असून २५ बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रेपो रेट ४ वरून ३.७५ वर आला आहे. या व्यतिरिक्त नाबार्ड, लघुउद्योग, नॅशन हाऊसिंग बँकांसाठी ५० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आरबीआयने केली.

कोरोनाचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणत आहे. कोरोनामुळे निर्यात घटली आहे. तसेच वीजेची मागणीही कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्री घटली आहे. भारतात इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम होत आहे. लॉकडाऊमुळे सध्या एटीएमचा सर्वाधिक वापर करण्यात येत आहे. जागतिक मंदीच्या संकटात २०२० मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक राहणार असून १.९ टक्के राहिल असा अंदाज आहे, असे आरबीयाच्या गव्हवर्नर दास यांनी सांगितले.

शक्तीकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • देशभरातील विजेची मागणी २५ ते ३० टक्क्यांची घटली
  • २०२२मध्ये भारताचा विकास दर ७.४ टक्के
  • लघु बँकिंग क्षेत्रासाठी ५० हजार कोटी
  • रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात, रेपो रेटमध्ये बदल नाही
  • एनबीएचसाठी १० हजार कोटींची तरतूद
  • सीडबीला १५ हजार कोटींची मदत
  • मायक्रो बँकिंगसाठी ५० हजार कोटी
  • रिव्हर्स रेपो रेट ४ टक्क्यांवरून ३.७५ टक्के
  • आरबीआयकडून नाबार्डला २५ हजार कोटींची मदत
  • देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा
  • करोनाच्या संकटामुळे निर्यातीत घट झालेली आहे, निर्यातीत ३४ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे
  • मंदीच्या पार्श्वभूमीवर १.९ विकासदर अपेक्षित
  • लॉकडाऊनच्या काळात ९९ टक्के एटीएमचा वापर, त्यामुळे देशभरातील एटीएम ९१ टक्केच्या क्षमतेने सुरू
  • इतर देशांच्या तुलनेत सध्या भारत चांगल्या स्थितीत
  • मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगही उत्तम प्रकारे सुरू आहे
  • ऑटोमोबईल क्षेत्रातील विक्रीत मोठी घट
  • कठीण काळातही आम्ही आशावादी आहोत
  • कोरोनामुळे कच्चा तेलाच्या किंमती मोठी घट
  • कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथाबालथ सुरू, यामुळे संपूर्ण जगावर सध्या मंदीचे सावाट
  • कोरोनामुळे आलेल्या मंदीच्या संकटाशी लढण्यासाठी आरबीआय प्रयत्न करत आहे
  • कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळले आहे.
  • आरबीयाचे १५० कर्मचारी क्वारंटाईन
  • बँक, वित्ती संस्थांतल्या कर्मचारऱ्यांचे शक्तीदांत दास यांनी आभार मानले
  • कोरोनाचा मुकाबलाकरण्यासाठी आरबीआयचे सर्व प्रयत्न
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानदीत बोट बुडून ९ जण बेपत्ता

News Desk

पालघर हत्याकांड : महाराष्ट्र सरकारने नवे पुरवणी आरोपपत्र दाखल करावे, सर्वोच्च न्यायालय

News Desk

चंद्राबाबूंनी खासदारांना भाजपमध्ये पाठवले | वायएसआर काँग्रेस

News Desk