HW News Marathi
महाराष्ट्र

ऊसतोड कामगारांसाठी माजी पालकमंत्री पंकजा मुंडे झाल्या भावूक

बीड | बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भावुक होऊन ऊसतोड कामगारांची समजूत काढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनमूळे या ऊसतोड कामगारांचे आतोनात हाल होत आहेत. बीडच्या माजी पालकमंत्री म्हणून त्यांनी समजूत काढत म्हटले, सरकारने आपल्या बाजूने निर्णय घ्यायचे म्हटले होते. मात्र, अजूनही कोणता ठोस निर्णय हाती आला नाही आहे. आपल्यावर खूप बिकट परिस्थिती आली आहे. मात्र सरकारने जर लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर मी तिथे येईन, असे आश्वासन त्यांनी ऊसतोड कामगारांना दिले आहे.

दरम्यान, कोल्हापूरा अवकाळी पाऊस पडल्याने तिथल्या ऊसतोड कामगारांचे छप्पर गेले, अन्न-धान्यात पाणी पडले आणि सगळे कामगार, महिला, लहान मुले पावसात भिजले, या सगळ्यांमुळे पंकजा मुंजे भावूक झाल्या. आणि त्यांनी ट्विटरवरुन कामगारांचे होणार हाल सरकारच्या निदर्शनासही आणून दिले होते. त्यामूळे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे या ऊसतोड कामगारांच्या बाबतीत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘स्वत:चं पोरं बसवलंय मंत्रीमंडळात; ST कामगारांची मुलं धाडलेत मृत्यूच्या दारात’-गोपिचंद पडळकर

News Desk

Bhima Koregaon : भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास 

News Desk

अशा परिस्थितीत पण मोदींना झोप लागत असेल तर…

News Desk