HW News Marathi
महाराष्ट्र

ताज हॉटेल्स ग्रुप’ आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात !

मुंबई | देशातील विविध भागात असलेल्या ‘ताज हॉटेल्स ग्रुप’ आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. राज्य सरकारसोबत या संदर्भात करार झाल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दिली आहे.“ताज हॉटेल्स ग्रुप आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या दोन दशकांपासून या क्षणाची वाट पाहत होता. महाविकास आघाडी सरकारने पहिल्या तीन महिन्यांतच समस्यांचे निराकरण केले आणि आज या संदर्भात सामंजस्य करार झाला.” असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
“तीन वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरु होणार आहे. ताज ग्रुपने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ हॉटेल स्थापित करण्यासाठी सुद्धा सामंजस्य करार केला. ही दोन्ही हॉटेल्स महाराष्ट्रात १२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणतील. संपूर्ण पर्यटन विभागासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण होता. अनेक हॉटेल ग्रुप महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याने महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळत आहे. यामुळे राज्यातील “मिशन बिगिन अगेन”ला सुद्धा चालना मिळणार आहे.” असा विश्वासही यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

102 व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरक्षणाचे अधिकार राज्यांना!

News Desk

कोकणातील प्रकल्प लातूरला नेण्याच्या मागणीवरून शिवसेना खासदाराचा अमित देशमुखांना टोला

News Desk

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk