HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यावर लाठीमाराबद्दल कारवाई करा प्रसाद लाड अन्यथा…!

मुंबई। भारतीय जनता पाटी युवा मोर्चाच्या कायकर्त्यावर मुंबई पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करताना भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी संबंधित पोलिसांवर सरकारने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सोमवारी पोलिस आयुक्तालयावर मोर्चा आणण्याचा इशारा त्यांनी आज येथे दिला.

मुंबईत जागोजागी रस्त्यांवर पडलेल्या खड्यांविरोधात युवा मोर्चाची मुले निदेर्शने करत असताना पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष ताजिंदर तिवाना आणि पदाधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात लाठीमार करत अमानुष पध्दतीने त्यांना मारहाण केल्याचा दावा श्री. लाड यांनी केला. यात युवा मोर्च्याचे कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना जीटीओ हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले. आज महात्मा गांधी जयंती असताना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तो अहिंसाचार दिन म्हणून साजरा केला जातो. अशा अहिंसेच्या दिवशी हिंसा करण्याचे कृत्य या उध्दव ठाकरे सरकारने केले.

मी सरकारला आणि पोलिसांना आवाहन करतो की, तत्काळ गावकर नावाचे एसीपी, एमआयडीसी पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा विनाकारण लाठीहल्ला केला असून त्यांचे पुरावे आमच्याकडे व्हिडीओच्या रुपाने आहे. या सर्वांवर तत्काळ सरकार आणि पोलिस खात्याने कारवाई करावी, अशी आमची मागणी असून जर याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर सोमवारनंतर पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तालयावर मोर्चा आणणार असल्याचा इशारा भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी आज येथे दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? – फडणवीस

News Desk

‘मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं’, शर्मिला ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया

News Desk