HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रामसेवकावर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी

सांगली | तासगाव तालुक्यातील लोढे गावात घरकुल योजनेअंतर्गत असलेल्या घरांच्या सर्वेच्या नावाखाली दिवसा ढवळ्या वसुली करण्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी आणि बुधवारी गावात झालेल्या या सर्वेत 60 घरांची पाहणी करण्यात आली आहे. या सर्व्हेसाठी नेमलेल्या डाटा ऑपरेटर किरण भोले व एका ग्रामसेवकाने प्रत्येकी 50 प्रमाणे 3 हजार रुपयांची वसुली केल्याची माहिती ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे. याप्रकरणी गावक-यांनी गटविकास अधिकारी अरुण जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार महेश गुरव यांनी केली आहे.

सदर निवेदनात त्यांनी सांगितले की पंतप्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना घरे देण्याचे सुरू आहे. दोन ते तीन दिवसांपासून लोढे गावात हा सर्वे होत आहे. यावेळी डाटा ऑपरेटर किरण भोले हे माझ्या घरी आले. फोटो काढला व फॉर्म भरत माझ्याकडे 50 रुपयांची मागणी केली. या सर्वेसाठी एका ग्रामसेवकचीही नेमणूक करण्यात आली होती. गावातील तरुणांच्या मदतीने या घरांचे फोटो काढण्यात आले मात्र त्यांच्याकडूनही पैसे घेण्यात आले. गावात 60 घरांचे प्रत्येकी 50 रुपये घेतल्याचे गावातून लोकांनी सांगितले. हा गंभीर प्रकार असून त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा गुरव यांनी दिला आहे. या निवेदनावर तौफिक तांबोळी, सौरभ करोडो यांच्या सह्या आहेत.

पैसे घेतले मात्र पावती दिलीच नाही

घरकुलच्या घरांच्या सर्व्हेला कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. मात्र लोढे गावात सर्व्हे करताना प्रत्येकाकडून 50 रुपये घेण्यात आले. मात्र पैसे दिल्याच्या पावतीची मागणी करताच किरण भोले याने त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. या प्रकरणाची वाच्यता होताच डाटा ऑपरेटर संघटनेच्या एका जबाबदार पदाधिकारयाने तो लांबून येतो पैसे घेतले तर घेतले असतील असे उत्तर देत त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांचे आंदोलन!

News Desk

भाजप नेते ST कर्मचाऱ्यांना भडकवतायत!;, राऊतांचा आरोप

News Desk

सोमय्यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल, उद्या चौकशीला हजर राहण्याचे समन्स

Aprna