HW News Marathi
Covid-19

OBC आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू । प्रीतम मुंडे

बीड । OBC आरक्षण रद्द झाल्यानंतर समाज रस्त्यावर उतरून तीव्र रोष व्यक्त करत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चक्काजाम केल्यानंतर परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत आज (२६ जून) चक्काजाम आंदोलन सुरू आहे. चक्काजामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चक्काजामनंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र असेल, असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.

परळी शहरातील इटके टी कॉर्नरवरील चक्काजाममुळे एक तास वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसून मनस्ताप सहन करावा लागला. चक्काजाम आंदोलनाच्या वेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचा नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज, मराठा समाज, यांच्या आरक्षणा संदर्भात अडचण निर्माण झाले आहेत. एवढं होत असतांना हे सरकार प्रत्येक प्रश्नासंदर्भात केंद्राकडे बोट दाखवतय. जर केंद्राकडे बोट करायचचं असेल तर महाराष्ट्राचा केंद्रशासित प्रदेश करायचा आहे का ? असा प्रश्न देखील खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीस उतावीळपणे चुकीचं वागतायत” ज्युलिओ रिबेरो यांना फडणवीसांचे लेखातूनच प्रत्युत्तर

News Desk

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र लस पुरवणार, १८-४४ वयोगटासाठी राज्यांनी लस खरेदी करणं योग्य – सुप्रीम कोर्ट

News Desk

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

News Desk