HW News Marathi
महाराष्ट्र

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक!

अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये ज्योती देवरे या आत्महत्येचा इशारा दिला होता. या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात पारनेर तालुका महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे.

ज्योती देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन

एक तर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करा, नाहीतर आमची बदली करा अशी मागणी संघटनेने केली आहे. पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामधील वाद शांत होत नाही तोच महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेने तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तक्रार दोन्ही संघटनांनी वरिष्ठांकडे केली

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या त्यांच्याविरोधात त्या दडपशाही आणि हुकूमशाही करत असल्याची तक्रार दोन्ही संघटनांनी वरिष्ठांकडे केली होती. एक वर्ष होऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी आज संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

अहवालामुळे ज्योती देवरे यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचं बोललं जात

ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशी अहवाल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्टला तयार करुन नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठवला होता. या अहवालामुळे ज्योती देवरे यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलं आहे की, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्य परायणता ठेवलेली नाही, कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पूजा चव्हाण प्रकरणात नवी ऑडिओ क्लिप समोर’, संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात!

News Desk

कोरोना लढाईतील ठाणेकरांचं काम मार्गदर्शक असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य!

News Desk

केंद्र सरकारनंतर आता राज्यानेही पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर केला कमी

News Desk