HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या उपाययोजनांना टाटा समूहाचा ५०० कोटींचा निधी जाहीर

मुंबई | कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहेत. उद्योगपतीही मदतीचा हात सर्सास पुढे करताना दिसत आहेत. रिलायन्स ग्रुपने सेव्ह हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांसाठी एक केंद्र उभारले. तर आता, टाटा ट्रस्टने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी ५०० कोटींचा निधी जाहीर केला आहे.

या संकटापासून वाचण्यासाठी तातजीने मदत करणे आवश्यक आहे आणि त्याचमूळे टाटा समूही ही मदत करत आहे, असे टाटांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आधी मेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनीही १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. तर, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनीही आपला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली होती.

कोरोनाबाधितांच्या सेवेला रात्रंदिवस नर्स, डॉक्टर काम करत आहेत. तसेच, रुग्णांचीही जेवनाखाण्याचे हाल होत आहेत. ते पाहून टाटा समूहाच्या ताज हॉटेलकडून या गरजू रुग्णांसाठी भोजणाची व्यवस्था केली आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयांत दाखल असलेले रुग्ण तसेच सर्व स्टाफच्या भोजनाची व्यवस्था ताज हॉटेलने केली आहे, असे ट्विट मुंबई पालिकेने केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या मालमत्तेसाठी त्याला ड्रग्स दिले, प्रताप सरनाईकांचा दावा

News Desk

“दरवाढ करणे गरजेचे आहे”, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk

आता नाना पटोलेंनीही दिला राजीनामा

Atul Chavan